- info@maharashtranaturepark.org
- कार्यालय +९१-९८१९०२६३०७
- रोपवाटीका +९१-९८१९०२६३०8
पक्षी
अलीकडच्या वर्षात विकासाच्या क्रियाकलपांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेषतः शहरीकरण त्यामुळे नैसर्गिक स्त्रोतांवरत्यांचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे. तसेच विकास कामे आणि वन्य जीवांचे संतुलन साधणे सोपे नाही. शहरीकरण झालेल्या सर्व क्षेत्रांमध्ये पक्ष्यांची विविधता आणि घनता कमी होत चालली आहे. परंतु मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानासारखी हरित पट्टा तयार करून पक्षांच्या संवर्धनास हातभार लावला आहे. उद्यानातील अनुकूल अश्या वातावरणामुळे शहरी तसेच स्थलांतरित पक्षांची ही हक्काची अधिवासाची जागा बनली आहे.
एका बाजूला मिठी नदीचा परिसर आणि दुसऱ्या बाजूला गजबजलेले शहरीकरण, यांच्या मध्यभागी असलेल्या या उद्यानात १२५ पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आढळतात. त्या जवळजवळ भारतात सापडणाऱ्या एकूण प्रजातींच्या १०% आहे. त्यामध्ये स्थलांतरित पक्षांचा देखील समावेश आहे. कीटकनाशक, स्वछ्ताकर्मी तसेच फळे खाणाऱ्या पक्षांचा उद्यानात वावर आढळतो. त्याचप्रमाणे असामान्य प्रजातींची देखील येथे नोंद आहे.
मुंबई शहराच्या मध्यभागी असल्यामुळे अभ्यांगतासाठी पक्षी निरीक्षण, पक्षी अभ्यासक आणि पक्षी छायाचित्रण यासाठी उद्यानहे चांगले स्थान आहे. उद्याना मध्ये आढळून येणाऱ्या काही पक्षांची नावे: शिंपी, स्वर्गीय नर्तक,कोकीळ, गायबगळा, साळूंखी, खंड्या,पोपट, पंचरंगी सूर्यपक्षी, तांबट आणि नाचरा.