निसर्ग फेरी : १५ हेक्टरचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान अन्नसाखळीच्या विषयावर आधारित आहे. उद्यानाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत निसर्ग फेरीचे जाळे पसरलेलं आहे. निसर्ग फेरीची एकूण लांबी १.८ कि.मी. एवढी आहे. निसर्ग फेरीचा पायवाट ही विटांनी बनवलेली आहे आणि जवळजवळ ९० % पायवाट ही विटांचीच आहे. उद्यानास भेट देणाऱ्या अभ्यांगतांना ह्या पायवाटेवरून उद्यानात फिरवले जाते व निसर्गातील घटकांविषयी माहिती दिली जाते. उद्यानात तीन प्रकारच्या निसर्ग फेरी आहेत त्या खालीलप्रमाणे :

मुख्य निसर्ग फेरी : ह्या निसर्ग फेरीची एकूण पायवाट ही सुमारे १.८ कि.मी. एवढी आहे. ह्या निसर्ग फेरीचीसुरुवात शैक्षणिक इमारतीपासून होते ते एकदम रोपवाटिकेपर्यंत जाते. ह्या फेरीमध्ये उद्यानात असलेले सर्व शैक्षणिक विभाग पहावयास मिळतात. ह्या फेरीमध्ये असंख्य प्रकारची वनस्पती, पक्षी, कोळी आणि सरपटणारे प्राणी यांना पाहण्याचा आनंद लुटता येतो.

मध्य निसर्ग फेरी :ही फेरी ४०० मी. लांबीची आहे. मध्य निसर्ग फेरीमध्ये फुलपाखरू विभाग, नक्षत्र वन, पावसाळी पाणी साठवणूक आणि १०० मी. चा जंगल विभाग यांचा समावेश आहे.

खाडीकिनारी आणि फायकस पट्टा फेरी : ह्या फेरीचीसुरुवात पावसाळी पाणी साठवणूक विभागापासून होते ते रोपवाटिके पर्यंत जाते. ह्या फेरीच्या पायवाटेवरून जात असताना एका बाजुला झाडा – झुडुपांची तर दुसऱ्या बाजूला मिठी नदीची झलक पहावयास मिळते. ह्या फेरीमध्ये फायकस या वंशामध्ये येणाऱ्या जातीची लागवड केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मिठी नदीमध्ये अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्ष्यांचा आनंद ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये लुटता येतो. तसेच गायबगळा, पानकावळा आणि खंड्या हे पक्षी ह्या फेरीमध्ये नियमितपणे दिसतात.

निसर्ग फेरीचे वेळापत्रक (शाळा/महाविद्यालय/संस्था यांसाठी) :

  • महाराष्ट्र निसर्ग उद्याना मध्ये निसर्ग फेरीचा आनंद लुटायचा असेल तर भेटदेण्याच्या तारखेच्या आठवडाभर आधी दूरध्वनी वरून सकाळ/दुपार सत्र राखून ठेवायला सांगणे गरजेचे आहे. तसेच एक पत्र “संचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था, धारावी, मुंबई- ४०० ०१७” यांच्या नावे सादर करणे गरजेचे आहे.
  • निसर्गफेरी दोन सत्रामध्ये खालीलप्रमाणे उपलब्ध आहे :

सकाळ सत्र : सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० पर्यंत

दुपार सत्र : दुपारी १२:३० ते दुपारी ३:३० पर्यंत

निसर्ग फेरीचे वेळापत्रक

सकाळ सत्र दुपार सत्र
शैक्षणिक केंद्रा मध्ये प्रवेश : ८:४५ ते ९:००
शैक्षणिक केंद्रा मध्ये प्रवेश : १२:१५ ते १२: ३०
उद्यानाबाबत माहिती आणि सादरीकरण : ९:०० ते ९:३०
उद्यानाबाबत माहिती आणि सादरीकरण : १२:३० ते १२:४५
मधली सुट्टी : ९:३० ते ९:४५
मधली सुट्टी : १२:४५ ते १:००
निसर्ग फेरी : ९:४५ ते ११:४५
निसर्ग फेरी : १:०० ते ३:१५
सकाळ सत्र समाप्त : १२:००
दुपार सत्र समाप्त :३:३०
  • अनुसूची आणि परवानगी निश्चित करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी / कार्यक्रम सहाय्यक यांना संपर्क साधा.
  • टीप : महाराष्ट्र निसर्ग उद्यान ४० विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या मागे एक निसर्ग संवादक पुरविते ज्याचे मानधन रु. ५००/- आहे.