- info@maharashtranaturepark.org
- कार्यालय +९१-९८१९०२६३०७
- रोपवाटीका +९१-९८१९०२६३०8
सुविधा
- मुख्य पृष्ठ
- सुविधा
शैक्षणिक केंद्र इमारत : सूर्यासारखी गोलाकार आकाराच्या अशी शैक्षणिक केंद्र इमारत ही एक मनोरंजक रचना आहे. अन्नसाखळीचे जसे जाळे असते. त्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक समाविष्ठ असतात त्याच आधारावर ह्या इमारतीमध्ये कलाकृती रेखाटून पृथ्वीवरील पंचमहाभूतांचे (सूर्य, हवा, आकाश, पाणी आणि वायू) उत्तम वर्णन येथे केले आहे. इमारतींचा आराखडा अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की जेथे सूर्यप्रकाश, वायुजीवन आणि थंड हवामानाचा इष्टतम वापर करता येतो.
दृक श्राव्य: दृकश्राव्य खोलीमध्ये ३०० लोकांसाठी बसण्याची क्षमता आहे. ह्या खोलीमध्ये निसर्गावर आधारित चित्रपट तसेच निसर्ग संरक्षण विषयावर आधारित परिसंवाद, कार्यशाळा आणि सादरीकरण, प्रशिक्षणशाळा यांच आयोजन केले जाते.
क्रियाकलाप जागा :निसर्गाशी निगडीत कला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच चित्रकला आणि इतर स्पर्धा घेण्यासाठी ह्या जागेचा वापर केला जातो.
निसर्ग कला दालन :कला दालनामध्ये निसर्गावर आधारित प्रदर्शन प्रदर्शित केले जाते. काही प्रदर्शन ही कायमस्वरूपी ठेवली जातात तर काही ऋतूनुसार बदलली जातात. प्रदर्शित केलेले प्रदर्शन हे निसर्गातील घटकांवर अवलंबून असल्यामुळे ते निसर्गाशी परस्परसंवादी असतात यामुळे निसर्गाचा अभ्यास करण्यास अभ्यांगताना सोपा जातो.
ग्रंथालय : शैक्षणिक केंद्राच्याइमारतीमध्ये ग्रंथालय उपलब्ध आहे. ह्या ग्रंथालयामध्ये वन्यजीव, पर्यावरणशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयांवर आधारित माहितीची पुस्तके व मासिके संकलित केली आहेत.
खुला रंगमंच :निसर्गातील विविध घटक साध्या सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या कला ह्या रंगमंचामध्ये सादर केल्या जातात. येथे जवळजवळ १००० पेक्षा जास्त श्रोत्यांची बसण्याची सोय आहे.