• कृपया निसर्ग पायवाटेवरूनच उद्यानात फेरफटका मारावा.
  • आपल्या बरोबर खाद्यपदार्थ आणताना ते कापडी किंवा कागदी पिशवीतच आणा. प्लास्टिक पिशवीचा व बाटलीचा वापर प्रकर्षाने टाळा. या उद्यानात प्लास्टिकच्या वापरास बंदी आहे.
  • शांत, स्वच्छ व नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी कृपया ओरडणे, किंचाळणे असे गैरवर्तन टाळा. तसेच मोबाईलवर गाणी लावणे इत्यादी प्रकार टाळा.
  • वापरून निरुपयोगी झालेला कचरा जवळच्या कचरा पेटीतच टाका.
  • उद्यानात मद्यपान, धूम्रपान करण्यास अगर आग पेटविण्यास सक्त मनाई आहे.
  • उद्यानात फिरताना भडक कपडे किंवा सुगंधीद्रव्याचा वापर टाळा.
  • उद्यानातील भटकंतीच्या वेळी मोठा गट करून फिरण्यापेक्षा ३ – ४ व्यक्तींचे लहान गट करून फिरा.
  • प्राणी पाणस्थळातील पाणी पितात तरी पाणी दुषीत होईल असे कोणतेही कृत्य करू नका.
  • उद्यानात वाढदिवस साजराकरणे, वैयक्तिक छायाचित्रण, प्रीविडींग छायाचित्रणाची परवानगी नाही.
  • वनसंपदेची ठेवी सोबत घरी घेऊन जाऊ नका.
  • नियमांचे काटेकोर पालन करून आम्हाला सहकार्य करा.